मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज भारतीय जनता पार्टीवर कळाडून टीका केली असून भारतीय जनता पार्टी यापूर्वी पार्टी होती जी आता भारतीय जनता लॉन्ड्री झाली आहे अशी टीका त्यांनी केले आहे.
यावेळी त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टीत येणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांना क्लीनचीट दिली जाते. म्हणून मी आता या पार्टीला भारतीय जनता लॉन्ड्री असेच म्हणते. सध्या भाजपात जुन्या जाणत्या निष्ठावंतांवर अन्याय केला जात असून आयारामांना रेड कार्पेट टाकले जात आहे, आरोपही त्यांनी केला आहे. असा पुढे त्या म्हणाल्या की, आमदारांपैकी ५० टक्के आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. तसेच सत्ता देखील स्थापन करताना जे सोबत आहेत तो पक्ष फुटलेलाच आहे. पक्षाला मोठं करणारा कार्यकर्ता आता त्यांच्यात दिसत नाही, सगळे नवीन चेहरे दिसतात, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सध्याच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीने जनतेला विविध प्रलोभने देऊन अच्छे दिन चे गाजर दाखवून हिंदुत्वाच्या गजर करत व राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम यावर भर देत भ्रष्टाचाराच्या तिरस्कार करत स्वच्छ व चारित्र्यसंपन्न राजकारणाच्या हवाला देऊन व गतकाळातील काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर टीका करत सत्ता मिळवली. मात्र यानंतर आपल्या सर्व आश्वासनांच्या या पक्षाला विसर पडला आणि आपली नीती मूल्ये व विचारधारा बाजूला ठेवून इतर पक्षातील सर्वाधिक भ्रष्ट लोकांना स्वायत्त संस्थांच्या धाक दाखवून कारवाईच्या भीतीने आपल्या पक्षात घेऊन स्वतःच्या पक्ष वाढवला. सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद या सर्व बाबींच्या उपयोग भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवण्यासाठी आणि सत्तेसाठी करत असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून याबाबत भाजपवर टीका केली जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना सुप्रियाताई सुळे यांनी भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता लॉन्ड्री म्हणत निशाणा साधला आहे.
