टेम्पोच्या धडकेत शिक्षिका ठार प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:माळेगाव बुद्रूक येथील ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षिका असलेल्या संगीता संपत नारगे (रा. कारभारीनगर, कसबा, बारामती) यांच्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून धडक दिली. या अपघातात नारगे यांचा मृत्यू झाला.

 माळेगाव येथे निरा- बारामती रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकऱणी माळेगाव पोलिसांनी किरण आनंद पाटील (रा. अवधान, जि. धुळे) या टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. संपत मारुती नारगे यांनी याबाबत फिर्याद दिली.

फिर्यादीच्या पत्नी संगीता या माळेगाव येथील ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षिका होत्या. शनिवारी त्या दुचाकीवरून (एमएच १२ एसएच ९७२२) बारामतीकडे घरी येत असताना माळेगावातील मुथा पेट्रोल पंपाजवळील स्पीड ब्रेकरजवळ त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. यावेळी पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच १८ बीजी ८६९०) वरील चालक किरण आनंद पाटील याने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात नारगे यांच्या हाताला, डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने