■ वाचन प्रेरणा दिनानिमित्त घोडलेपाडा येथे वाचनालयाचे उदघाटन ◆◆ -युवकमित्र परीवार संस्थेचा'गाव तिथे वाचनालय'उपक्रम




- माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंती, वाचन प्रेरणा दीनानिमित्त युवकमित्र परिवार नंदुरबार या संस्थेच्या सहकार्याने घोडलेपाडा ता.शहादा येथे वाचनालय स्थापन करण्यात आले.यावेळी उदघाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी डी. टी. वळवी हे होते तर  अध्यक्षस्थानी सरपंच अण्णा पटले हे होते.प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच दादा भंडारी,भोरटेक येथील पत्रकार कल्पेश राजपूत, शाळा समितीचे अध्यक्ष हिरालाल बिरारे, पोलीस पाटील दशरथ अहिरे,शिक्षक रवींद्र बडगुजर चांदसैलीचे सामाजिक कार्यकर्ते हिम्मत पावरा यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावेळी राज्यात वाचन चळवळ राबविणाऱ्या युवकमित्र परिवार या संस्थेमार्फत पुस्तके मोफत भेट देण्यात आली.यासाठी जि.प.शाळेचे शिक्षक रवींद्र बडगुजर,युवकमित्र परीवार संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन यांचे सहकार्य लाभले.तसेच यावेळी जि.प.शाळेत बालवाचनालय स्थापन करण्यात आले.यावेळी गटशिक्षणाधिकारी डी टी वळवी यांनी विद्यार्थ्यांना दररोज वाचन करण्याचे व भारताचा एक सुजाण नागरिक घडण्याचे आवाहन केले.पत्रकार कल्पेश राजपूत यांनी युवकमित्र परीवार व वाचन चळवळ याची माहिती दिली.सूत्रसंचालन  रवींद्र बडगुजर यांनी केले तर आभार कल्पेश राजपूत यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने