नवागांव(बुडकी) रस्त्यावर सुसाट वाहनांना लागला बेक्र जितेंद्र पावरा यांनी केली होती बांधकाम विभागाला गतिरोधक बसविण्याची मागणी....*




शिरपुर :- तालुक्यातील पानसेमल ते बोराडी मुख्य रस्त्यावर येणाऱ्या नवागांव (बुडकी) या महामार्गावर सातत्याने होत असलेल्या लहान - मोठे अपघात होतात त्यांत काही जण अपघातात मृत्यूमुखी पडले तर काही जखमी होत होते. या परिसरात रहिवासी वस्ती, जि.प.शाळा आदि असल्याने वर्दळ गर्दी अधिक असते त्यामुळे वाहनांनचा अपघात होत होते. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावी या संदर्भात जितेंद्र पावरा(महा. राज्य संपर्क प्रमुख) - जय रावण प्रतिष्ठान महा.राज्य यांनी शिवसेना तालुका प्रमुख अत्तरसिंग पावरा यांच्या शी संपर्क साधुन व बांधकाम विभाग शिरपुर यांच्या शी चर्चा करण्यात आली व घटनेची दखल सबंधित विभागाने अखेर शुक्रवार रोजी नवागांव गावात गतिरोधक बसविण्यात आले त्या बद्दल अनिल पावरा (ग्रामपंचायत सदस्य), प्रधान पावरा (सदस्य), लक्ष्मण पावरा (पो.पाटील) व समस्त ग्रामस्थांनी बांधकाम विभागाचे आभार मानले....

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने