शिरपूर - दिनांक 29.10.2022 शनिवार रोजी वनावल विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईसचेअरमन यांची बिनविरोध निवड पार पडली. शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख तथा मार्केट कमिटीचे मा. संचालक मोहन नाना पाटील, शि.सा.का. संचालक भरत पाटील, जातोडे हायस्कूलचे राऊळ सर, व ॲड. छोटू पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली. या निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित चेअरमन अमृत आबा पवार व व्हाईसचेअरमन श्रीमती आयनुरबाई बाबूलाल गिरासे यांची निवड करण्यात आली. शेतकरी विकास पॅनलचे 12 पैकी 7 संचालक निवडून आलेले आहेत. त्यात तज्ञ संचालक म्हणून श्री. दिनेश बाबा पाटील व हारून मुसा पटेल यांची निवड करण्यात आली व संचालक म्हणून दरबारसिंग सिंग राऊळ, जितेंद्र कुवरसिंग राऊळ, ललिताबाई रतन पाटील, बारकू व्यंकट धनगर,मधुकर नामदेव धनगर या सर्व नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व पॅनल प्रमुख यांची वनावल गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व सर्व गावकऱ्यातर्फे त्यांच्या स्वागत सत्कार करण्यात आला.
या निवडणुकीसाठी धुळे व नंदुरबार विधान परिषद आमदार अमरीशभाई पटेल, शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा, शिरपूर शहराचे मा. उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जि. प.धुळे मा. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, मा.नगरसेवक अशोक कलाल, भाजपा मा. तालुका अध्यक्ष आबासो राहुल रंधे, वनावल गटाच्या जि. प.सदस्या अभिलाषा भरत पाटील, प्रियदर्शनी सूतगिरनी संचालक जगतसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक संपन्न झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.व्ही.पवार यांनी काम पाहिले.
