धुळे, शिरपूर, उमर्द गावत २८ अक्टूबर २०२२. संजीवनी हेल्पिंग हँड फाउंडेशनने ,अभ्यास समर्थन केंद्रात (एसएचएचएफ) वंचित व गरजू मुलांच्या फराळ व कपडे वाटप केले.
सदर उपक्रमासाठी विजय सर: सामाजिक विकास केंद्र मुंबई, मारिया फर्नांडिस मैडम मुंबई,सुनंदाताई अहिरे मैडम, राजेश अहिरे सर, प्रो. रोहिणी जगदेव मैडम : लसीकरण क्षेत्र अधिकारी आनी अर्चना मैडम ने फराळ व कपडे देऊ केले त्यासाठी आभार मानले *संजीवनी हेल्पिंग हँड फाऊंडेशन*
सदर कायक्रमत ह्यात प्रमुख पाहुणे वन क्षेत्रपाल अधिकारी आनंद मेश्राम,लसीकरण क्षेत्र अधिकारी प्रो.रोहिणी जगदेव, अभियंता अमोल अहिरे,अर्चना मैडम,राजेश अहिरे, संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल पावरा, श्री. खंडू गुलवणे ग्रामपंचायत सदस्य, संस्थेचे ट्रस्टी श्रीमती टीमकाबाई फिरंया पावरा, पवन पावरा उपस्थित होते.
या कार्यक्रम उपस्थित असलेले सर्वांचे प्रमुख पाहुणे यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल पावरा यानी केले.
मुलांना आणि मुलांचा पालकांना थोडक्यात अनमोल मार्गदर्शन केले वन क्षेत्रपाल अधिकारी आनंद मेश्राम,लसीकरण क्षेत्र अधिकारी प्रो. रोहिणी जगदेव.
सरकारी योजनेचा लाभ आदिवासी वृद्धांना मिळावे यासाठी संजीवनी हेल्पिंग हांड फाउंडेशन कार्यरत असणार आहे ह्यासाठी सातत्यांने प्रयत्न करणार आहे, तसेच येणाऱ्या काळात युवा मंडळा बरोबर ही संजीवनी हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशन कार्य करणार आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून युवकांना पुढे घेऊन जाण्याची मोहीम संजीवनी हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशन हाती घेणार आहे .
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश अहिरे, ज्योती पावरा मॅडम व शेवटी आभार प्रदर्शन करीना पावरा मॅडम यांनी केले.
Tags
news
