गावाला जातो म्हणून स्वतःच्याच पत्नीवर ठेवली पाळत.. आणी तिच्या मित्राचा केला खुन प्रतिनिधी दत्ता पारेकर






पुणे: पिंपरी येथे चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकून दहाव्या मजल्याच्या गॅलरीतून फेकून दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर घटनेत पत्नीच्या मित्राचा जागीच मृत्यू झालेला असून महिलेचा पती पंकज शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, निलेश अशोक जोर्वेकर असे मयत व्यक्तीचे नाव असून पंकज शिंदे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. मी गावाला जात आहे असे सांगून पंकज बाहेर पडला आणि त्यानंतर पंकज याच्या पत्नीचा मित्र असलेला निलेश अशोक जोर्वेकर हा तिला भेटायला आला मात्र संशयी वृत्तीचा पंकज याने घरावर पाळत ठेवली होती त्यावेळी त्याच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर पत्नी आणि तिचा मित्र घरात असताना पंकज हा घरी पोहोचला.

अचानकपणे आपला पती घरी आलेला पाहून पत्नी आणि तिचा मित्र यांच्यात आणि पंकजमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली आणि त्यानंतर पंकज याने धारदार शस्त्राने निलेश याच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात निलेश गंभीर जखमी झाला मात्र तरीदेखील पंकज याने त्याला पकडून घराच्या गॅलरी नेऊन फेकून दिले त्यात त्याचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून पंकज हा या दोघांवर पाळत ठेवून होता असे रहिवाशांकडून सांगण्यात आले असून याआधी देखील त्यांच्यात भांडणे झाली होती अशीही माहिती समोर आली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पंकज याला बेड्या ठोकल्या आहेत .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने