शिरपूर - पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून आणि शेताच्या बांधावरून निमझरी रस्त्यावर दुचाकी अडवून 72 वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर 60 वर्षीय वृद्ध शेतकऱ्यांने मारहाण करीत ब्लेडने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लक्ष्मणराव शंकरराव सुर्यवंशी,वय-72, रा 49 हिरानगर शहादा रोड शिरपूर जि.धुळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.दाखल तक्रारीनुसार संशयित छगन नथ्थु मराठे अंदाजे वय 60, रा.मराठा गल्ली शिरपूर, जि.धुळे याने 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी निमझरी स्त्यावरील लहान पाट ते निमझरी दरम्यान दिलीप जैन यांच्या शेतालगत मोटारसायकल अडवून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून आणि शेताच्या बांधावरून वाद घालून लाकडी काठीने व हातांबुक्क्यांनी मारहाण करीत गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत ब्लेडने वार केल्याची तक्रार दाखल दाखल झाल्याने संशयित छगन नथ्थु मराठे रा,. मराठे गल्ली शिरपूर यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पीएसआय संदीप मुरकुटे करीत आहेत.
%20(23).jpeg)