शिरपूर शहरातील बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई




शिरपूर - शहरात विना वाहन परवाना,तीन सीट,विना कागदपत्रे,विना हेल्मेट,बेशिस्त फिरणाऱ्या दुचाकी इतर वाहन धारकांवर शहर पोलिसांकडून शहरातील करवंद नाक्यावर गुरुवारी सायंकाळी अचानक धडक कारवाई सुरू केल्याने दुचाकी चालकामध्ये एकच धावपळ उडाली.
            शिरपूर शहरात वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर व पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख या अधिकाऱ्यांना आढळून आल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी पीएसआय प्रसाद रौदळ यांच्या नेतृत्वात शहर पोलिसांच्या वाहतूक शाखा, डीबी पथक,आणि आरसीपी पथकाच्या साहाय्याने शहरातील करवंद नाक्यावर अचानक वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यास सुरुवात करीत ड्रंक अँड ड्राईव्ह ,तीन सीट,विना हेल्मेट,विना लायसेन्स, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली त्यामुळे वाहन चालकामध्ये चांगलीच तारांबळ उडाली.मात्र त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना चांगलाच चाप बसला आहे.वाहन तपासणी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांनी करवंद नाक्यावर भेट देत पाहणी करीत पथकास मार्गदर्शन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने