पुणे:विवाहितेच्या समोर आक्षेपार्ह चाळे करणाऱ्या एका तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. चाकणमधील आगरकरवाडी रस्त्यावरील आर्या गणेश सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. पंचवीस वर्षीय महिला त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीला आपल्या गॅलरीमध्ये खेळवत होत्या. त्यावेळी संबंधित २१ वर्षीय तरुणाने काही अश्लील चाळे करीत लैंगिक संबंधाची मागणी केली. महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी उज्वल शिवाजी भोसले (वय २१, रा. आर्या गणेश सोसायटी, आगरकरवाडी रस्ता, चाकण, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे.
.jpeg)