आमोदा ग्रामस्थांकडून नवनिर्वाचित जिल्हा परिषद उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापती उपसभापती यांच्या सत्कार




शिरपूर प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत शिरपूर तालुक्यातील करवंद येथील व शिंगावे गटातील जिल्हा परिषद सदस्य व ना.अमरीश भाई पटेल यांचे विश्वास पात्र राजकीय समर्थक मा. श्री देवेंद्र जयराम पाटील यांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याने त्यांच्या जाहीर सत्काराच्या आयोजन अमोदा ग्रामस्थांतर्फे गावातील सारंगेश्वर महादेव मंदिरात आयोजित केले होते. यावेळेस शिरपूर पंचायत समिती च्या सभापती पदावर सौ लताबाई वसंत पावरा यांची निवड झाल्याने व उपसभापती पदावर विजय संतोष बागुल यांची निवड झाल्याने त्यांच्या देखील सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते वसंत मांगू पावरा यांच्या देखील या वेळेस सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री गोकुळसिंग चींधू राजपूत यांनी स्वीकारले. सोबत या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले तरुण युवा नेतृत्व पंचायत समिती सदस्य यतिष सोनवणे व पंचायत समिती सदस्य चंद्रकांत भाऊसाहेब यांच्या देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात परिसरातील सरपंच बांधवांच्या देखील सत्कार करण्यात आला. अर्थे येथील सरपंच साहेबराव पाटील, बोरगाव येथील सरपंच योगेंद्र राजपूत, जातोडे येथील जयसिंग राजपूत ,ताजपुरी येथील हेमंत सनेर, मांडळ चे सरपंच सुनील सोनवणे ,अहिल्यापूर सरपंच संग्राम सिंग राजपूत , खर्दे सरपंच सुनील भास्कर, हिंगोनी सरपंच सोमा भिल इत्यादी मान्यवरांच्या देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष व सभापती यांनी या परिसरासाठी विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही जे जे काही  विकास कामांसाठी करणे शक्य असेल ते सगळे प्रयत्न अवश्य केले जातील व या गावातील परिसराचा विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल अशी आश्वासन नवनिर्वाचित सदस्यांनी दिले.
याप्रसंगी ग्रामस्थांकडून सदरच्या सत्कार समारंभात गटनेते जगदीश नाना देशमुख, राज देशमुख ,दरबार सिंग राजपूत ,रणजीत सिंग राजपूत ,मुन्ना भाऊ राजपूत ,गोकुळ सिंग राजपूत ,कृपाल सिंग राजपूत, महारुसिंग राजपूत, नरवीर सिंग राजपूत ,पोलीस पाटील निखिल राजपूत, देवेंद्र राजपूत ,भैय्या राजपूत, यशपाल राजपूत ,राजभाऊ राणावत, राज गिरासे ,जयपाल राजपूत, विकास राजपूत, अंकित राजपूत ,नरेंद्र गिरासे, गजेंद्र राजपूत, योगेश देशमुख ,मयूर राजपूत ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत नीकवाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राज देशमुख यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने