पत्नीचा खून; पतीला अटक प्रतिनिधी दत्ता पारेकर

 


पुणे:खेड तालुक्यातील कुरुळी येथे एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मैना सतीश जाधव (वय ३२ सध्या रा. कुरुळी, ता, खेड, मूळ रा. परभणी ) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने तिचा खून केल्याची बाब समोर आली असून संबंधित महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सतीश भानुदास जाधव (वय ४०,  सध्या रा. कुरुळी, ता, खेड, मूळ रा. परभणी ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. 

पत्नी मैना यांना पती सतीश याने केलेल्या मारहाणीत मैना यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली.  तातडीने त्यांना उपचारासाठी पिंपरीच्या वाय सी एम  रुग्णालयात हलवण्यात आले.



मात्र उपचारादरम्यान  त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पती सतीश यास ताब्यात घेतले असून अधिकचा तपास म्हाळुंगे पोलीस करीत आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने