आक्षेपार्ह खेळणी ‘ गोदामात लपवून सुरु होता व्यवसाय प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून पुण्यात दहा लाख रुपये किमतीचे सेक्स टॉईज जप्त करण्यात आलेले आहेत. लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गोदामावर छापा टाकून या सर्व ‘ आक्षेपार्ह खेळण्या ‘ पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. सदर व्यक्तीवर कलम 292 293 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू होती तसेच फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम यावर या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जात होत्या. सदर गोडाऊनमध्ये असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर ‘ आक्षेपार्ह खेळणी ‘ काही अल्पवयीन मुली  मुलांना विकल्या जात होत्या का ? याचा देखील पोलीस सध्या शोध घेत आहेत.

एका संकेतस्थळावरून या वस्तूंची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या संकेतस्थळाला भेट देऊन खात्री करून घेतली आणि त्यानंतर पुलगेट चौकीच्या बाजूला असलेल्या भाजी बाजारच्या गोदामावर अचानकपणे छापा टाकला त्यावेळी तिथे या सर्व ‘ आक्षेपार्ह खेळण्या ‘ आढळून आल्या. गोदामातील एका व्यक्तीला ताब्यात घेत पोलिसांनी मुद्देमाल जप्त केलेला असून सदर प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत याचाही पोलीस शोध घेत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने