हर्षवर्धन पाटील यांचे बिरोबाला साकडे सर्वांचे चांगले व्हावे यासाठी केली प्रार्थना प्रतिनिधी दत्ता पारेकर




  पुणे: इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील श्री. बिरोबा यात्रेनिमित्त समस्त धनगर बहुजन समाजाचे दैवत श्री. बिरोबा देवाचे दर्शन राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतले तसेच त्यांनी यावेळी बिरोबाला साकडे घालून सर्वांचे चांगले व्हावे यासाठीची प्रार्थना केली.
  बिरोबा देवाचे दर्शन घेऊन, कपाळी भंडारा लावून , बिरोबाच्या नावाचं चांगभलं म्हणत राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बिरोबा देवाला सर्वांचे चांगले होवो यासाठी साकडे घातले. भरणेवाडी येथील ग्रामस्थांनी यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना काठी आणि घोंगडे देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
    कोरोना कालावधीनंतरच्या या यात्रेमध्ये भाविकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने