पुणे: इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नामांकित आय टी कंपन्यांमध्ये कॅम्पस मुलाखतीतून चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मधील विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने कॉग्निझंट, एच सी एल, इ झेस्ट, इन्फोसिस,एचसीएल ,विप्रो ,कॅपजेमिनी,मसिस टेकनॉलॉजि ,पेंटागॉन स्पेस , क्यू स्पायडर ,बी इ पी इंडिया सिस्टिम या कंपन्यांचा समावेश आहे. महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील कु. स्वप्नाली जगताप हिची इ झेस्ट या कंपनीमध्ये ६ लाख प्रति वर्ष,
व्ही ओ आय एस मध्ये ५ लाख प्रति वर्ष,
विप्रो मध्ये ३.५ लाख प्रति वर्ष,अटॉस सिन्टेल मध्ये ३.५ लाख प्रति वर्ष तसेच क्यू स्पायडर मध्ये ३ लाख प्रति वर्ष अशा कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस टी शिरकांडे यांनी दिली.
एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात उत्तम बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांचे उत्तम करिअर होण्यासाठी चांगल्या कंपनीत प्लेसमेंट होणे आवश्यक असते. त्यासाठी एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट साठी त्याची तयारी, आवश्यक असलेल्या बाबी तसेच आवश्यक असलेले गुण व एकत्रित सर्व तयारी करून घेतली जाते. यामुळे प्लेसमेंटला सामोरे जात असताना विद्यार्थी सर्व गुणसंपन्न तयार होतो, त्यातूनच विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये प्लेसमेंट होत असते. सुरुवातीपासून प्लेसमेंट ची तयारी करून घेत असल्याने विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावरच विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत आहे. महाविद्यालयातील इ अँड टी सी विभागातील कु. स्वप्नाली जगताप हिने प्लेसमेंट ची तयारी करत एकापेक्षा एक पॅकेज असलेल्या एकूण पाच कंपन्यांमध्ये नोकरी मिळवली.
महाविद्यालयातील सर्व लॅब्स या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज आहेत. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी सतत प्रयत्न करत राहतात. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात विध्यार्थ्यांना ट्रैनिंग आणि प्लेसमेंट विभागामार्फत अँपटीटयूड टेस्ट , कम्युनिकेशन स्किल ,टेकनिकल स्किल ,मॉक इंटरव्हिव ,ग्रुप डिस्कशन यांचे मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे वर्कशॉप आणि ट्रेनिंग केले जातात, या सगळ्याचा कु. स्वप्नाली जगताप हिला खूप फायदा झाला असे तिने सांगितले.
या विभागाचे विभागप्रमुख प्रा. व्ही यू बनसुडे हे नेहमी सर्व विद्यार्थ्यांची निवड नामांकित कंपन्यांमध्ये व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात. इ अँड टी सी विभागाची पदवी घेतल्याने कोर इलेक्ट्रॉनिक्स,टेलिकॉम सेक्टर',गव्हर्नमेंट सेक्टर यामध्ये चांगल्या नोकऱ्या आहेत त्याचबरोबर सॉफ्टवेअर क्षेत्रातहि ई अँड टी सी विभागातील विद्यार्थ्यांना चांगले करियर करता येते त्यामुळे विद्यार्थ्यांनी ई अँड टी सी विभागाची निवड केली तर त्यांचे भविष्य उज्वलच होणार आहे. ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. पी. कांबळे आणि संपूर्ण टीम विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी नेहमीच तत्पर असते. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’चा विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी फायदा होत आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस टी शिरकांडे म्हणाले.
या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन पाटील सचिव.सौ. भाग्यश्री पाटील ,उपाध्यक्षा सौ. अंकिता पाटील-ठाकरे आणि विश्वस्थ राजवर्धन पाटील यांनी निवड झालेल्या विध्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन लाभते.
.
