मृतदेह घेऊन नातेवाईक पोहचले पोलीस ठाण्यात ; हत्येतील आरोपींना अटक करण्याची मागणी प्रतिनिधी दत्ता पारेकर





  पुणे: चाकण मध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून झाला. यातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करा अशी मागणी करत खून झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेह थेट पोलीस ठाण्याच्या समोर आणून ठिय्या आंदोलन केले. चाकण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले असून हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेल्याचा प्रकार मंगळवारी (दि. ११ ऑक्टोबर रोजी ) चाकण पोलीस ठाण्याच्या समोर घडला. 
  युसुफ अर्षद काकर ( वय १९ , रा. खंडोबा माळ,चाकण ) या तरुणाची हत्या सोमवारी (दि.१० ऑक्टोबर रोजी ) करण्यात आली.


या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात  प्रणव ऊर्फ पन्या संजय शिंदे या प्रमुख आरोपीसह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यातील सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येच्या घटनेनंतर काकर कुटुंबीय आणि नातेवाईक संतप्त झाले होते. त्याच रागातून युसुफ याचा मृतदेह अंत्यसंस्कारा पूर्वी चाकण पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर आणण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने