पुणे: इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग महाविद्यालयामध्ये , महिला दक्षता समिती तसेच गुणवत्ता हमी कक्ष (आय क्यू ए सी) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिर चे आयॊजन दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला दक्षता समिती प्रमुख प्रा. एम व्ही गायकवाड, गुणवत्ता हमी कक्ष (आय क्यू ए सी) प्रमुख डॉ. ए.बी गवळी तसेच कार्यक्रम प्रमुख प्रा.आर.एल.घुले तसेच सर्व महिला सदस्यांनी प्रयत्न केले . यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस टी शिरकांडे यांनी आलेल्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. या कॅम्प साठी प्राथमिक आरोग्य केंद्र पळसदेव चे उपकेंद्र असलेले गलांडवाडी नंबर १ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.ईशा बंगेरा व डॉ. प्रीती रेड्डी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रियंका गजाकोश, आरोग्य सेविका श्रद्धा पाचनकर, आरोग्य सेवक तानाजी कांबळे तसेच लॅब साठी बिभीषण वामेकर यांनी परिश्रम घेतले व यांनी सर्व विद्यार्थिनींना आरोग्य विषयक मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरा मध्ये महाविद्यालयातील जवळपास २०० विद्यार्थिनींचे आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये विद्यार्थिनींचा हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण तसेच बी एम आय ची तपासणी करण्यात आली .
या निम्मिताने संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील साहेब, सचिव भाग्यश्री पाटील , उपाध्यक्षा अंकिता पाटील- ठाकरे आणि विश्वस्थ राजवर्धन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
