पुणे:इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागातील २०२१-२२ वर्षातील विद्यार्थ्यांची नामांकित आयटी कंपन्यांमध्ये कॅम्पस मुलाखतीमधून निवड झालेली आहे.क्यू स्पायडर या कंपनीमध्ये खालील बारा विद्यार्थ्यांची निवड झाली असून ते सध्या ट्रेनिंग घेत आहेत त्यामध्ये रहीम बागवान, दंडवते प्रसन्ना, दातीर प्रतिक्षा, देशमुख प्राजक्ता, ढोकरे निकिता, घोगरे अशोक, इंगवले पूजा,जगताप सायली, कोठावळे कोमल, पवार शिवानी,पवार स्वप्नजा,गिरी महेश अशी क्यू स्पायडर मध्ये निवड झालेल्या मुलांची नावे आहेत. इन्फोसिस या कंपनीमध्ये कुणाल बोडके, प्रतीक्षा दातीर, स्वप्नाली गायकवाड, साक्षी गांधी, महेश गिरी ऋषिकेश जाधव, समीर कुदळे, वैष्णवी मस्के,मयुरी पवार, संकेत झांबरे अशा अकरा विद्यार्थ्यांची निवड झालेली असून त्यांना प्रति वर्ष ३.६ लाखाचे पॅकेज मिळाले आहे. विप्रो या आयटी कंपनीमध्ये कुणाल बोडके, प्रतीक्षा दातीर, साक्षी गांधी, महेश गिरी, पूजा काटकर, प्रगती खोडवे, अंजली क्षीरसागर, दत्ता मगर, शुभम पवार, सिद्धिका सय्यद, संकेत झांबरे,चैतन्य मगर या विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना ३.५ लाख प्रती वर्ष पॅकेज मिळाले आहे. कॅपजेमिनी या कंपनीमध्ये कुणाल बोडके, ऋषिकेश जाधव, अंजली क्षीरसागर, सिद्धिका सय्यद आणि स्वप्नाली शिंदे या विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना ४ लाख प्रती वर्ष एवढे पॅकेज मिळाले आहे.तर संभाजी बोराटे हा विद्यार्थी एच एस बी सी या आयटी कंपनीमध्ये २.८ लाख प्रती वर्ष आणि त्याचीच मरसर या कंपनीमध्ये सुद्धा ५.५ लाख प्रती वर्ष पॅकेज असलेल्या आयटी कंपनीमध्ये निवड झाली आहे.चैतन्य मगर, दत्ता मगर, प्रगती खोडवे आणि साक्षी गांधी या विद्यार्थ्यांची टीसीएस ( ३.५ लाख प्रती वर्ष)या कंपनीमध्ये निवड झाली आहे.सय्यद तन्वीर हा विद्यार्थी टेक हायवे ३ लाख प्रती वर्ष तर सायली जगताप हि बरलीन सोफ्टेक ६ लाख प्रती वर्ष तर संध्या गोसावी हिची हिताची कंपनीमध्ये ५ लाख प्रती वर्ष तसेच सौरभ शिंदे ह्याचे वोडाफोन या कंपनीमध्ये ५ लाख प्रती वर्ष निवड झाली आहे. याव्यतिरिक्त रोहित लकडे हा एच सी एल ४.२५ प्रति वर्ष तसेच वैष्णवी ही स्कोपसिस ३.६ लाख प्रती वर्ष मयुरी पवार हिची पेंटागॉन स्पेस ३ लाख प्रती वर्ष आणि अभिषेक क्षीरसागर हयाची हेक्सावेअर या आयटी कंपनीमध्ये निवड झालेली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक माननीय हर्षवर्धन ची पाटील यांनी अभिनंदन केले आहे.चैतन्य मगर दत्ता मगर, प्रगती खोडवे, आणि साक्षी गांधी या विद्यार्थ्यांची टीसीएस ( ३.५ लाख प्रती वर्ष)या कंपनीमध्ये निवड झाली आहे. सय्यद तन्वीर हा विद्यार्थी टेक हायवे ३ लाख प्रती वर्ष तर सायली जगताप हिची बरलीनसोफ्टेक ६ लाख प्रती वर्ष तसेच संध्या गोसावी हिची हिताची या कंपनीमध्ये ५ लाख प्रती वर्ष सौरभ शिंदे याची वोडाफोन कंपनीमध्ये ५ लाख प्रती वर्ष निवड झाली आहे. याव्यतिरिक्त रोहित लकडे हा एच सी एल ४.२५ प्रति वर्ष तसेच वैष्णवी ही स्कोपसिस ३.६ लाख प्रती वर्ष मयुरी पवार हिची पेंटागॉन स्पेस ३ लाख प्रती वर्ष आणि अभिषेक क्षीरसागर याची हेक्सावेअर या आयटी कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. यानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील साहेब सचिव भाग्यश्री पाटील उपाध्यक्ष अंकिता पाटील आणि विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.टी शिरकांडे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर एस पी कांबळे आणि ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक किमया गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
एस बी पाटील कॉलेज मधील संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची नामवंत आयटी कंपन्यांमध्ये निवड. प्रतिनिधी दत्ता पारेकर
byMahendra Rajput
-
0
