*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याने सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिक पेटून उठला आहे. आता शिवसैनिक गद्दारांसह साथ देणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी येथे केले. शिंदखेडा शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालय येथे शिंदखेडा व शिरपूर पदाधिकारी-कार्यकर्ते यांची बैठक बबनराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत *गद्दारांनी चिन्ह गोठवलं, निष्ठावंतांचे रक्त पेटवलं* अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी पुढे बोलतांना श्री.थोरात म्हणाले की, सत्ता व मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी गद्दारांनी उध्दवसाहेब ठाकरे यांना विविध मार्गांनी त्रास दिला. शिवसेनेचे चिन्ह गोठावण्यापर्यंत यांची मजल गेली. यामुळे सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिक पेटुन उठला आहे. तो आता स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात या गद्दारांबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली आहे. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आता जास्तीत जास्त घरा-घरात जावून शिवसेना सदस्य नोंदणी करावी. एका गावात किमान दहा नवीन लोक जोडावी. प्रत्येक घरातील सदस्याला शिवसेनेचे विचार पटवुन द्यावे. शिवसैनिकाने आता संघर्ष करायला तयार रहावे, असेही थोरात म्हणाले.
सध्याचा काळ हा संकटाचा काळ असुन सगळीकडे गलिच्छ राजकारण सुरु आहे. या वातावरणातही उध्दवसाहेब ठाकरे हे संयमाने वागत आहे. शिवसैनिकाने आता गावागावात जाऊन संघटनेची बांधणी करावी. येणाऱ्या नगर परिषद निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करा. शिंदखेडा विधानसभा मतदार संघात जनताच शिवसेनेला न्याय देईल, असा विश्वास जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा समन्वयक डॉ.भरत राजपुत, युवासेना जिल्हायुवाधिकारी आकाश कोळी, उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपुत, उपजिल्हासंघटक कल्याण बागल, भाईदास पाटील, विभा जोगराणा, विधानसभा संघटक गणेश परदेशी, शिंदखेडा तालुकाप्रमुख गिरीश देसले, शिरपुर तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, माजी जि.प.सदस्य छोटु पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सर्जेराव पाटील, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, तालुका समनव्यक विनायक पवार, तालुका संघटक डॉ.मनोज पाटील, शानाभाऊ धनगर, मनोज पवार, शहरप्रमुख संतोष देसले, माजी शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, राकाशेठ रुपचंदाणी, अनिकेत बोरसे, सागर पवार, जितेंद्र राठोड, अभय भदाणे, दिनेश गुरव, जितेंद्र पाटील, आर.आर.पाटील, चंद्रसिंग ठाकूरसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
