ग्रामसेवक लाच घेताना जाळ्यात मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कारवाई प्रतिनिधी दत्ता पारेकर



   पुणे:चाकण औद्योगिक भागातील मेदनकरवाडी येथील एका सदनिकेची नोंद करून घरपट्टी भरून घेण्यासाठी ५ हजार रुपये लाच घेताना ग्रामसेवक राजाराम दामू रणपिसे ( वय ५५) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई मेदनकरवाडी ( ता. खेड ) ग्रामपंचायत कार्यालयात केली आहे.
 एका २६ वर्षीय युवकाच्या वडिलांनी मेदनकरवाडी येथे एक सदनिका खरेदी केली होती, या सदनिकेची नोंद व घरपट्टी जमा करून घेण्यासाठी ग्रामविकास अधिकारी रणपिसे यांनी लाचेची मागणी केली होती. त्यामुळे संबंधित युवकाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ग्रामसेवकाने पैसे दिल्या शिवाय काम करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. मात्र तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. एसीबी पथकाने अनेकदा या बाबतची पडताळणी केली. पडताळणीमध्ये रणपिसे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवारी मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून ५  हजार रुपये लाच घेताना ग्रामसेवक रणपिसे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती. सदरची ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने