पुणे:भागीदारीत सुरु केलेला
दवाखान्यातील एक भागीदार गावी गेला असताना तो लॉकडाऊनमध्ये गावी अडकला. याचा फायदा घेऊन दोघांच्या नावे असलेल्या हॉस्पीटलसाठी आलेले ई.एस.आय.सी.चे सुमारे 1 कोटी 47 लाख रुपयांचे योजनेचे पैसे दुसऱ्या भागीदार डॉक्टरने नवीन खात्यात वळवून फसणूक केली आहे. प्रकार चाकण येथे 14 मार्च 2020 ते 13 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी संजिव राजेंद्र भारती यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 44 वर्षीय महिला व विलास सोमनाथ गिरी (वय 52 रा.चाकण) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण येथील समर्थ हार्ट केअर अँन्ड ट्रामा सेंटर रुग्णालयात हा प्रकार घडला असून चाकण पोलीस पुढिल तपास करत आहेत.
