शिरपूर शहरातील मुकेशभाई पटेल टाऊन हॉल समोरून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयितास शहर पोलीसांनी गुरुवारी रात्री बेड्या ठोकल्या असून बलात्काराच्या गुन्ह्यासह विविध कलमाची वाढ करीत अटक केली.चेतन बापू थोरात वय 20 रा.गौतमनगर शिरपूर असे संशयिताचे नाव आहे.त्याने 20 ऑगस्ट 2022 रोजी शिरपूर शहरातील मुकेशभाई पटेल टाऊन हॉल समोरून 17 वर्ष 6 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात पीडितेच्या वडीलांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय संदीप मुरकुटे करीत असतांना पीडित अल्पवयीन मुलगी व चेतन बापू थोरात यास ताब्यात घेतले.पीडित अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून चेतन बापू थोरात यास ताब्यात घेत बलात्काराचा गुन्ह्यासह पोक्सो आणि विविध कलमान्वये वैद्यकीय तपासणी करून गुरुवारी रात्री अटक केली.शुक्रवारी धुळे येथे न्यायालयात हजर करण्यात आले असून एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
Breaking News शहरातील मुकेशभाई पटेल टाऊन हॉल समोरून अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी शहर पोलिसांनी संशयितांस केली अटक बलात्कार,पोक्सोसह विविध कलमाची करण्यात आली सदर गुन्ह्यात वाढ
byMahendra Rajput
-
0