पुणे: सांस्कृतिक शहर विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सत्यम शिवम फाऊंडेशनच्या वतीने सेक्स तंत्र या एक ते तीन ऑक्टाेबर दरम्यान तीन दिवसांच्या शिबीराचे आयाेजन करण्यात आले हाेते. याबाबतची ऑनलाइन बुकिंगची जाहीरात साेशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली हाेती. मोठ्या विरोधानंतर आता हा कार्यक्रम रद्द झाला आहे, तशी स्पष्टोक्ती उत्तरप्रदेशातील आयोजकांकडून देण्यात आली.
दरम्यान या कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी या विरोधात आवाज उचलत उचलला होता व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार पोलिसांनी या कार्यक्रमाच्या हातावर गुन्हा दाखल केला असून त्यास पोलीस लवकरच ताब्यात घेतील अशी माहिती प्राप्त झाली आहे.