मलाही तुझ्यासोबत यायचंय ‘ म्हणत पाचव्या मजल्यावरून घेतली प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:आपल्या मैत्रिणीने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन जात असताना तिच्या मैत्रिणीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे. सदर प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


उपलब्ध माहितीनुसार, सारिका हरिश्‍चंद्र भागवत ( वय 19 राहणार क्रिस्टल सोसायटी शेवाळवाडी ) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड ( वय 19 राहणार मराठी शाळेसमोर शेवाळवाडी ) अशी या मैत्रिणींची नावे आहे. शेवाळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेमागे क्रिस्टल सोसायटीत मंगळवारी ही घटना घडलेली असून सारिका आणि आकांक्षा या दोघी लहानपणापासूनच्या मैत्रिणी होत्या.


सारिका हिने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर तिला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले तेव्हा आकांक्षा रडत ‘ मलाही तुझ्या सोबत यायचे आहे ‘ असे म्हणत होती आणि त्यानंतर तिने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेनंतर दोन्ही कुटुंबात शोकाकुल वातावरण पसरलेले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने