शिदंखेडा तालुक्यातील मेथी येथे टाटा व्हालिन्टरिंग वीक१८ निमित्ताने वृक्ष दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम* *ह.भ.प.ओंकारेश्वर महाराज* दोडाईचा अख्तर शाह



शिदंखेडा तालुक्यातील 
मेथी येथे टाटा समूहाचे राष्ट्र उभारणीत फार मोठं योगदान असुन संकटकाळी हा समुह प्रत्येक वेळी धावुन आला आहे. त्याचाच भाग म्हणून आपल्या पंचक्रोशीत होत असलेला सौरउर्जा प्रकल्प हा जणु सूर्य नारायणाचे रूप घेऊन आला आहे असे उद्गार ह.भ.प.श्री. ओंकारेश्वर महाराज ह्यांनी टाटा व्हालिटरिंग वीक१८ निमित्त वृक्ष दिंडी सोहळ्यात केलं.
टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ट्रस्ट, ग्रामपंचायत मेथी, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, अंगणवाडी, युवक मंडळ, भजनी मंडळ, बचत गट व टाटा पॉवर चे कर्मचारी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.
संपुर्ण गावभर वृक्ष दिंडी काढून पारंपरिक पद्धतीने भजन, पोवाडा, गवळणी व ग्रामविकासाला धरून गाणी व घोषणा देत भक्तिमय वातावरणात दिंडी काढण्यात आली.
टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांनी झाडांना जाळ्या करुण दिल्या व मोठी झाडे उपलब्ध करून वृक्षारोपण करण्यात आले.
टाटा पॉवरच्या धोरणानुसार मेथी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट कटिबद्ध आहे असे उद्गार कंपनीचे सीएसआर विभागाचे अधिकारी विश्र्वास सोनवले ह्यांनी सांगितलं. ह्यावेळी इतर मान्यवरांची भाषणे झाली. गावचे सरपंच सौ. बागले ताई, मराठी शाळेचे व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायतीचे सदस्य, सन्माननीय ग्रामस्थ, युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेद अभियानाचे कार्यकर्ते श्री. दीपक गोसावी ह्यांनी आभार मानले. सदर दिंडी यशस्वी होण्यासाठी रमाकांत बागले भठेसिंग गिरासे रणसिंग गिरासे  राजू सूर्यवंशी बापू माळशे इत्यादींनी सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने