शिरपूर - दि.11/09/2022 राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्माजी याच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. सदर अधिवेशनात राष्ट्रवादी कॉँग्रेस चेक जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खा.सुप्रियाताई सुळे, प्रदेश अध्यक्ष मा.जयंत पाटीलसाहेब , विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, आ.एकनाथ खडसेसाहेब , मा आमदार अनिल गोटे साहेब, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग तसेच युवक प्रदेशउपाध्यक्ष ललित बागूल , माजी आमदार खासदार व लाखोंच्या संख्येने युवक उपस्थित राहणार आहेत व युवकाच्या विविध समस्यांवर चिंतन व मार्गदर्शन लाभणार आहे ..
सदर अधिवेशनात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉ मनोज महाजन यांच्या नेतृत्वात शिरपूर येथून शेकडोंच्या संख्येने युवक रेल्वे आणि बसने प्रस्थान करीत आहेत.
सदर कार्यक्रमास धुळे जिल्हाअध्यक्ष सुरेशअण्णा सोनवणे , कार्याध्यक्ष प्रशांत भदाणे, जितेंद्र मराठे तसेच जेष्ठ नेते रमेश आबा करंकाळ यांच्या शुभेछा मिळाल्या... सदर अधिवेशनात प्रस्थान करताना सौ अमृता मनोज महाजन , डॉ मनोज महाजन, हेमराज राजपूत याच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले ...