नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या. दोंडाईचा नाभिक समाजाची मागणी. दोंडाईचा- (अख्तर शाह)

 


सेलू येथे दहा वर्षीय मुलीचे अपहरण करून तीच्यावर अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवार दि. 9 रोजी दोंडाईचा शहर नाभिक समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निदर्शने करत आरोपींना फाशीची द्या, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र मोरे यांना देण्यात आले.. 

सेलू जि. परभणी शहरातील १० वर्षीय मुलगी व तिचा मावसभाऊ हे सेलू-देवगाव रस्त्यावर उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी अपहरण करून मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर आरोपींना पकडण्यात आले असले तरी सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. 

सेलू येथील घटनेच्या निषेधार्थ दोंडाईचा शहर युवक मंडळांसह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने दोंडाईचा अप्पर तहसील कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिडीत मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना चा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षा द्यावी तसेच त्वरित शासन स्तरावरून तात्काळ आर्थिक मदत देऊन सहाय्य करावे. अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र मोरे यांना देण्यात आले. 

याप्रसंगी दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, तालुका अध्यक्ष रविंद्र चित्ते, शहराध्यक्ष छोटू महाले, युवक मंडळाचे शहराध्यक्ष समाधान ठाकरे, दुकानदार शहराध्यक्ष किरण सुर्यवंशी, भावराव सैंदाणे, अनिल ईशी,  महेंद्र चित्ते, गणेश पवार, कैलास चित्ते, देविदास चित्ते, गोपाल बोरसे, हिम्मत पवार, मुकेश चित्ते, पंकज सैंदाणे, आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या होत्या...

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने