माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी...




धनूर - धनूर लोणकुटे गावाचे आदर्श सरपंच, कै. तात्यासाहेब शिवाजीराव नथ्थू पाटील यांची २०वी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली, त्यानिमित्ताने गावात अनेक कार्यक्रमांची रेलचेल आयोजित करण्यात आली होती.

            धनूर लोणकुटे गावाचे तब्बल ३२ वर्ष सलग सरपंचपद भूषविणारे नेतृत्व म्हणून तात्यासाहेबांची गावात ओळख आहे. त्यांनी गावात केलेली विकासकामे ही आजदेखील लोकांच्या लक्षात आहेत. त्यांच्या २०व्या पुण्यस्मरणानिमित्ताने सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिमापूजन व आदरांजलीसाठी कार्यक्रम झाला. यावेळी अध्यक्षस्थानी बळीराम गोसावी होते. यावेळी त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

 शैक्षणिक साहित्याचे वाटप : 

तात्यासाहेबांचे नातू व धनूर लोणकुटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री चेतन शिंदे यांच्या माध्यमातून धनूर येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांना कंपासपेटी, वही, पेन इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अनंत खैरनार होते.

 समाज प्रबोधनावर कीर्तन : पुण्यस्मरणार्थ रात्री ८ वाजेला धनूर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह मध्ये ह.भ.प. जनार्दन महाराज आरावेकर यांचे दणदणीत कीर्तन पार पडले. यावेळी गावातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.


 प्रतिक्रिया : आजोबांनी केलेल्या सेवेप्रमाणे गावाची सेवा करण्याचा मनोदय असून, त्याप्रमाणे सामाजिक उपक्रमाद्वारे केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. गावाची सेवा हीच आजोबांना खरी आदरांजली असेल.

- श्री. चेतन दादा शिंदे

  (सामाजिक कार्यकर्ते) 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने