बेटावद - बेटावद येथील ग्रा.पं. च्या गैर व्यवहाराबाबत निधीच्या गैरव्यवहाराबाबत संबंधितांवर गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नाही त्याबाबतीत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन सादर
मौजे बेटावद येथील ग्रा. पं. चे तत्कालीन ग्रामसेवक एस. एम. राठोड यांनी १४ वित्त आयोग निधी व १५ वा वित्त आयोग निधी या निधी च्या रकमेचा गैरव्यवहार केल आहे. त्यात कामे न करता निधी काढणे, काही कामांचा निधी काढुन ती कामे पूर्ण न करणे, झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केलेली आहेत. दसर न लिहणे, कामावर सतत गैरहजर राहणे इ. सदर कामांबाबत चौकशी झाली त्यात कामे न करता परस्पर निधी अपहार, निधी काढल्यानंतर ही कामे अपूर्ण, झालेली कामे निकृष्ट दर्जाची असा चौकशी अहवाल देखील संबंधीत चौकशी अधिकरी यांनी वरीष्ठांना सादर केला आहे. सदर ग्रामसेवक यांचे कडुन बेटावद ग्रा.पं. चा कार्यभार काढुन घेण्यात आला आहे. तरी देखील ग्रामसेवक यांनी वित्त आयोग निधी दप्तरी चार्ज ग्रामसंदक बेटावद यांना आज तागायत दिलेला नाही. (सामान्य कॅश बुक नं. ५, धनादेश, अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तीका इ.) आम्ही तक्रारदार तसेच ग्रामसेवक यांनी वरिष्ठ कार्यालयाला सदर दप्तरी चार्ज संबंधित भ्रष्टाचारी ग्रामसेवकाने दिलेला नाही सबब गावात पुढील विकास कामे खोळंबलेली आहेत. सदर बाब वर्तमान पत्र, न्युज चैनल्स यावर देखील या बाबत वृत्त अनेक वेळा प्रसध्दि झाले आहेत.
तक्रारदार यांनी अनेक वेळा संबंधितांवर कारवाईची मागणी केली तरी देखील गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी सदर ग्रामसेवक यांस पाठिशी घालीत आहे व त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही तसेच ग्रा.पं. बेटावद यांना सदर दतरी चार्ज ही देण्यास ग्रामसेवकास सांगत नाही व त्याबाबत कोणतीही कारवाई करीत नाहीत त्यामुळे १५ वित्त आयोग अंतर्गत सन २०२० २१ २०२१-२२ व २०२२-२३ मंजूर कामे खोळंबलेली आहेत. यावरुन सिध्द होते की, म. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.धुळे व गटविकास अधिकारी पं. स. शिंदखेडा हे देखील ग्रामसेवक एस. एम. राठोड यांनी केलेल्या भ्रष्टाचारास सहमत आहेत.
तरी ग्रा.प. बेटावद येथील निधीच्या गैरव्यवहार व दप्तरी चार्ज याबाबत आपण दखल घेवुन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करुन ग्रामसेवकाने परस्पर निधी खर्च केला (कामे न करता) तो निधी ग्रा. प. ला परत मिळवून देवून ग्रा. प. बेटावद ला आपणा कडुन न्याय मिळू शकतो का त्या बाबत आपणास विनंती.
निवेदन देतेवेळी अनिल अशोक महाले, प्रभाकर नारायण कोष्टी ,कमलेश राजेंद्र माळी उपस्थित होते.