शिरपूर येथील त्रिमूर्ती गणेश मंडळातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन*




शिरपूर प्रतिनीधी : तालुक्यातील शिरपूर येथील भगवंत पार्क, राधेय नगर व सिसोदिया नगर यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती गणेश मंडळाकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तिघं कॉलनी मिळून २००७ साली म्हणजे १३ वर्षा पूर्वी त्रिमूर्ती गणेश मंडळाची स्थापना केली ज्यात मंडळाचे अध्यक्ष कुवरसिंग चव्हाण व उपाध्यक्ष राजू धनगर हे काम पाहतात.

दर वर्षी या मंडळातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी देखील रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची, गीत गायन स्पर्धा, अहिराणी नाटिका इ. कार्यक्रम राबविण्यात आले होते.

रांगोळी स्पर्धेदरम्यान घरोघरी अंगणात रांगोळी काढण्यात आली. रांगोळी स्पर्धेत रुचिता योगेंद्रसिंग सिसोदिया या 12वीच्या विद्यार्थीनीचा प्रथम क्रमांक आला.

यावेळी चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे निरीक्षण पी. डी.सोनार सरांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने