चाकण गुरांचा आठवडे बाजार बंद प्रतिनिधी दत्ता पारेकर




  पुणे:लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर चाकण मधील गुरांचा बाजार शनिवार १० सप्टेंबर पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ग्रामीण भागात जनावरांना लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग झाला असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी   गुरे व म्हशी (जनावरांची) खरेदी विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील आदेश येपर्यंत प्रतिबंध घालण्यात आलेला असल्याचे खेड बाजार समिती प्रशासनकडून सांगण्यात आले आहे.  कृषि उत्पन्न बाजार समिती, खेड यांच्या महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण येथील रोहकल रोडवरील भरणारा गाय, बैल, म्हैस, रेडे इत्यादी जनावरांचा शनिवारी भरणारा आठवडे बाजार पुढील आदेश येपर्यंत बंद ठेवण्यात आलेला आहे. परंतु दर शनिवारी भरणारा  शेळ्या मेंढ्या बकरी बाजार आज व पुढेही  नियमितपणे सुरू राहणार  असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने