शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगांव येथे 15 वित्त आयोगाच्या निधीतून भूमिगत गटारीचे भूमिपूजन करण्यात आले.
भूमिगत गटारी मुळे ग्रामस्थांची डास मच्छरांचा त्रासापासून मुक्तता होणार आहे तसेच उघड्या गटारीतील घाणी मुळे दुर्गंधी पासून बचाव होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, ग्रामसेवक पी बी सोनवणे, माजी सैनिक तथा वि का सोसायटी व्हा चेअरमन दगेसिंग राजपूत, कौतिक तोताराम न्हावी, श्रावण ओंकार पाटील, बाबुराव बोरगावकर, हरी गबा न्हावी, दौलत रामसिंग राजपूत, ग्राम पंचायत कर्मचारी धुडकु भिल, कत्राटदार राजू पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
news