शिरपूर शेतकरी साखर कारखाना भाडे कराराने देण्याचा ठराव विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर






शिरपूर : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना विशेष सर्वसाधारण सभा 10 सप्टेंबर 2022 सकाळी 10 वाजता माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.



यावेळी आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, शिरपूर पंचायत समिती सभापती सत्तरसिंग पावरा, साखर कारखाना संचालक राहुल रंधे, प्रकाश चौधरी, नारायणसिंग चौधरी, के. डी. पाटील, संग्रामसिंग राजपूत, वासुदेव देवरे, दिगंबर पांडू माळी, भरत पाटील, बन्सीलाल पाटील, धनंजय पाटील, जयवंत पावरा,  सौ. सुचिताताई पाटील, सौ. मंगलाताई दोरिक, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील, योगेश बोरसे, राजगोपाल भंडारी, अनेक मान्यवर उपस्थित होते.



प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांनी केले.

सुरुवातीला अनेक दिवंगत मान्यवर यांना श्रद्धांजलीचा ठराव करुन सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. 


त्यानंतर, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित शिवाजीनगर, दहिवद ता. शिरपूर जि. धुळे (महाराष्ट्र) हा बहु-राज्यस्तरीय सहकारी साखर कारखाना भाडे कराराने देण्याबाबत संचालक मंडळाच्या मागील सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेण्याबाबतचा ठराव सूचक प्रभाकरराव चव्हाण यांनी मांडला. माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच टेंडर बाबत अंमलबजावणी होईल असेही त्यांनी जाहिर केले. सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. अनुमोदन मोहन पाटील यांनी दिले. सर्वसाधारण सभेला संचालक, मंडळ, सभासद, शेतकरी, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी साखर कारखाना भाडे कराराने देण्याचा ठराव मंजूर झाल्याबाबत उपस्थित सर्वांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रगीताने विशेष सर्वसाधारण सभेचा समारोप झाला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने