संत सावता माळी गणेश मित्र मंडळातर्फे गणेशोत्सव आनंदात संपन्न*




                       शिरपूर— वरवाडे  संत सावता माळी चौक येथील संत सावता माळी गणेश मित्र मंडळाने सामाजिक,धार्मिक,प्रबोधनात्मक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दररोज प्रमुख अतिथी शि.व.न.पा. माजी उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,माजी नगराध्यक्षा संगिताबाई देवरे,बोराडी सरपंच राहुल रंधे ,शिरपुर पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख साहेब,माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,माजी उपनगराध्यक्ष मोतीलाल माळी,माजी नगरसेवक दिपक माळी,माजी नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी नगरसेवक गणेश सावळे,भटु माळी,रविंद्र माळी,संजय चौधरी ,भालेराव माळी,संतोष माळी,हेमंत माळीसर,नितीन माळी,उमेश पाटील,सुभाष माळी या सर्व मान्यवरांना महाआरतीचा मान देण्यात आला त्यात रांगोळी स्पर्धा,अंधश्रध्दा निर्मुलन सादरकर्ते दुष्यंत पाटील,पैडणी खेळ स्पर्धा व स्रीबुन हत्या प्रवचन सादरकर्ते विजय बागुलसरांनी आपल्या परिवारावर चांगले संस्कार, आचार विचार ज्वलंत उदाहरण देऊन,काही रुढी परंपराविषयी ,मुलीवरच बंधन का मुलांवर का नाही अशा प्रकारे सर्वांना मंत्रमुग्ध करुन घेतले लेझीम स्पर्धात लहान गट व मोठे गट सामिल करुन हेमंत शेठेसर व नयना माळी यांचे सहकार्य लाभले आयतं पोयतं सख्यान एकपात्री अहिराणी नाटक सादरकर्ते प्रविण माळीसर यांनी खान्देशीतल्या आपल्या अहिराणी बोलीभाषा शैलीतुन कृतीतुन सर्वाना हसुन हसुन लोटपोट करुन घेतले सांस्कृतिक कार्यक्रमात लहान लहान मुलांनी डान्स सादर केले तसेच शेतकरी,डाॅक्टर,देशभक्तीपर प्रबोधन केले आशा प्रकारे प्रबोनात्मक चालना देणारे तरुण मुलांना आई वडीलांचा आदर,सेवा करा असे कार्यक्रम घेण्यात आले तसेच मतदान कार्ड आधारशी  लिंक मोहिम राबविण्यात आली व क्षयरोग दुरीकरण अभियान डाॅ.पवार व आशा वर्कर टीम व्दारा क्षयरोग बॅनर लावुन सर्व गणेश भक्तांना माहिती देण्यात आली सुत्रसंचालन बापु मास्तर व विजय बागुलसर यांनी केले तसेच गणेश मंडळाचे अध्यक्ष हर्षल माळी,हरीश माळी,महेश माळी व सर्व सदस्यांनी मेहनत,सहकार्य केले या सर्व कार्यक्रमात लहान मुल ,महिला व मुलींनी विशेष सहभाग  घेतला यात स्पर्धेत ज्यांचा नं. आला अशा सर्वांना बक्षिस ,स्ट्राफी,रोख बक्षिस भुपेशभाई फ्रेड सर्कल मार्फत देण्यात आले गणराया विसर्जनी चिमुकलींनी लेझीमच्या तालावर ठेका धरला गणराया समोर दागंडदींगा न करता आजच्या तरुणांनी   प्रबोधनात्मक,सामाजिक चालना देणारे कार्यक्रम घेऊन आनंदात गणेश उत्सव साजरा केला

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने