नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात ब्रि.अंकुशविहीर येथील अश्वत्थामा माध्यमिक विद्यालयात 14 सप्टेंबर रोजी मेवासी वन विभाग अक्कलकुवा तर्फे नंदुरबार जिल्ह्यातील पहिली ' चिता ' वन्यप्राणी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.*
*या प्रसंगी शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री.जी.के.चव्हाण सर,श्री.पी.बी.साळवे सर,श्री.के.बी.राजपूत सर, मेवासी वन विभागाचे वनपाल श्री.सूर्यवंशी साहेब,श्रीमती.कल्पना धात्रक मॅडम,श्रीमती.विजया मोरे मॅडम,लक्ष्मण सांगळे,तसेच मीना वसावे,अनिता बागुल,निला पाडवी, सायना पावरा ( वनरक्षक ) , शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.*
*वनपाल कल्पना धात्रक यांनी चिता वन्यप्राणी जनजागृती कार्यक्रमाची माहिती दिली.वनपाल श्री.सूर्यवंशी साहेब यांनी चिता प्राण्याची शास्त्रीय माहिती दिली.चिता प्राणी व बिबट्या प्राणी यान विषयी तुलनात्मक फरक सांगितला.तसेच भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांचा जन्म दिवशी चिता प्राण्याचे भारतात आगमन होणार आहे.भारतीय वन्यप्राणी अभ्यासकांमध्ये या बाबतीत असलेली उत्सुकता याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पी.एच.चव्हाण यांनी केले.आभार प्रदर्शन श्री.यू.आर. सोनवणे सर यांनी केले.*