धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथे शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय आहे पण बऱ्याच वर्षापासून या रुग्णालयाला स्वतंत्र पशुवैद्यकीय अधिकारी नाही व रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे. याकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. एका पशुवैद्यकीय डॉक्टर कडे अनेक गावांचा चार्ज असल्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी वेळ देणे शक्य नाही. तरीदेखील ते वेळ देण्याचा प्रयत्न करतात. परंतु दोन-तीन गाव मिळून का असेना एक पशुवैद्यकीय अधिकारी नेमावा अशी मागणी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी विवेकानंद संस्थेकडून वेळोवेळी जिल्हा परिषद पंचायत समिती वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले आहेत पण त्यावर अजूनही उपाययोजना नाहीत.शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याचे दागडूजीकरण करून त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी व दवाखाना सुरळीत चालू ठेवावा अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. जनावरांवर लंपी नावाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढणाऱ्या बातम्या ऐकू आल्यावर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून शासनाकडून लवकरात लवकर लसीकरण अभियान व जनजागृती अभियान राबविण्यात यावे अशी मागणी शेतकरी व स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी जयदीप पवार,प्रवीण बोरसे, अनिल शिंदे, आनंदा मराठे, अविनाश वाघ, स्वप्निल पवार, अक्षय पवार, राजेंद्र पाटील,जितू बोरसे,समाधान पिंजन, चंद्रकांत मिस्त्री, विजय माळी, भिकन मराठे, गोपाल मराठे, दादाभाऊ मराठे,निलेश पवार,तुषार पवार आदींनी केली आहे.
Tags
news