चिंचखेड्यात कण्हेर नदीला पूर तरुणांच्या मदतीने बसेस मधील प्रवाशी सुखरूप बाहेर....*




चिंचखेडे

गेल्या 2 दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस झाला,त्यात चिंचखेडे भिरडाई,मुकटी येथील कण्हेर नदी ओसंडून वाहू लागली. यावेळेत धुळे येथून येणारी फागणे आमदड चिंचखेडे ते अंचाडे बस नदी किनारी अडकली. या बसेस मध्ये विद्यार्थ्यांसह वृद्ध प्रवाशी होते. तब्बल दोन ते तीन तास वाहने थांबली त्यात पाण्याचा ओघ वाढू लागला होता.वेळीच सतर्कता दाखवून आपल्या गावातील प्रवाशांना सुखरूप गावात परत आणण्यासाठी पोलीस मित्र लालचंद देसले यांच्यासह काही तरुणांनी धाव घेतली व प्रवाशी विद्यार्थ्यांना खांद्यावर बसवून दोराच्या सहाय्याने  सुखरूप बाहेर काढले या विद्यार्थी व प्रवाशांनी नरेंद्र देसले,विजय देसले,अभिषेक देसले,किरण देसले,आकाश गायकवाड, वैभव देसले,डॉ.भूषण चव्हाण,निखिल देसले,कल्पेश देसले,भैय्या माळी, प्रशांत देसले,समाधान मोरे,नरेंद्र मोरे,जयेश देसले,सतिष मराठे,राहुल पवार, भूषण सैंदाणे, मंगेश चव्हाण या तरुणांचे आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने