*शिरपूर (प्रतिनिधी):* 11 सप्टेंबर 2022: युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा शिरपूर च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील धुळे झोन 36-बी अंतर्गत मानव एकता दिवसाच्या निमित्ताने *शिरपूर येथील शकुंतला मँरेज लाँंस करवंद शिरपूर* येथे सकाळी 9.00 ते 4.00 यावेळी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. एक दिवस अगोदर वरवाडे पासुन संपूर्ण शिरपुर शहरात जनजागृती पायदल रँली करण्यात आली होती. यावेळी रक्तदान शिबीराचे उदघाटन *शिरपूर तालुक्याचे आमदार मा. श्री. काशिराम पावरा जी* यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन तसेच फित कापुन करण्यात आले . *कार्यक्रमाच्या वेळी माजी उपनगराध्यक्ष मा.वासुदेव देवरे , मा. धुवकुमार वाघ, वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय , डॉ. अनंत नानासाहेब चव्हाण, वैद्यकीय अधिकारी होळनांथे, डॉ. मनोज पाटील, वैद्यकीय अधिकारी खर्दे,माजी उपनगराध्यक्ष मा.काशीनाथआबा माळी मा. संत सावता माळी समाज मंदिर सहसचिव संतोष माळी, उपस्थित होते*
• त्यावेळी आमदार साहेबांनी उपस्थित मंडळाचे सर्व अधिकारी कार्यकर्ते मिशनच्या कार्याची प्रसंशा करत म्हणाले की मिशन आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमात जसे रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण , नेत्र तपासणी इ. कार्यात योगदान देत आहे. *धुळे विभागाचे क्षेत्रीय प्रभारी श्री. हिरालाल पाटील जी* यांनी आमदार साहेबांचे स्वागत व सत्कार करत निरंकारी मंडळाच्या वतीने आभार मानले. तसेच
• यावेळी *एकुण 160 रक्तयुनिट संकलन* करण्यात आले. रक्त संकलनासाठी भाऊसाहेब हिरे मेडिकल काँलेज चे डॉक्टर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.*
मानव एकाता दिनाचे अवचित्त साधून संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते ज्यामध्ये सुमारे 80000 ते 90000 युनिट रक्त संकलित होत असते.
रक्तदान शिबिरांच्या दरम्यान प्रशासनाकडून देण्यात आलेले कोविड -19 चे निर्देश लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेतली गेली.
या विशाल रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांसाठी अल्पोपहार ,जेवनाची उचित व्यवस्था तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीपणासाठी शिरपूर च्या संत निरंकारी मिशन चे साध संगत सेवादल अधिकारी जगदीश माळी व शिरपूर शाखेचे मुखी गणेश पाटील सह सेवादल सदस्य पुरुष व महिला यांनी सकाळपासूनच आयोजन नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले.
Tags
news