श्रीगणेश उत्सवानिमित्त वरवाडे गावात विविध कार्यक्रमात एकपात्री आहिराणी नाटक आयतं पोयतं सख्यान आनदोत्सवात संपन्न*

                                   



             

शिरपुर—वरवाडे येथील संत सावता माळी चौक जवळील संत सावता माळी गणेश मित्र मंडळ वतीने आयोजीत दि.६/९/२०२२ रोजी रात्री ९ वा. गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमात सातव्या दिवशी एकपात्री आहिराणी नाटक आयतं पोयतं सख्यान सादरकर्ते शिरपुरकर प्रविण शांताराम माळीसरांचे ३३४ वे पुष्प गुंफले सुरुवातीला प्रविण माळीसर यांचे गणेश मंडळाचे कार्यकर्तेंनी सत्कार केला वरवाडे गणेश भक्तांना प्रविण माळी सरांनी पहिल्यांदा पोट धरुन हसवुन दणदणीत खणखणीत  समाजप्रबोधनासह संपुर्ण विनोदाने भरलेला डोळ्यात आनंदाश्रृ आणणारे अशा भरगच्च कार्यक्रमात लग्नातल्या खान्देशी रीती प्रथा तसेच  अहिराणी भाषेचे महत्व पटवुन दिले व जीवनात आई वडीलांचा मान राखा,सेवा करा अशा प्रकारे सर्वांना गणेश भक्तांना   तमाम माता बघिणींसह,मान्यवर,वृध्द,युवक ,बालक वर्ग  सर्वांना आनंदीत,हसत हसत मंत्रमुग्ध करुन घेतले  अशा प्रकारे अहिराणी बोली भाषा खान्देशात प्रत्येक भागात गेल्यावर कशी बदलते याचे कृतीतुन,अदाकारीने आपल्या वाणीतुन आनंदात्मक  सर्व गणेश भक्तांना प्रसन्न करुन घेतले व अहिराणी भाषेचा अभिमान असु दयावा व आपल्या पुढच्या पिढीला पण सांगत राहणे                             आयोजक— संत सावता माळी गणेश मित्र मंडळ वरवाडे शिरपूर

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने