धुळे - दि. १४/०९/२०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवपूर धुळे येथे हिंदी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य श्री. एस. जी. सिसोदिया होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक श्री. आर. एन. पाटील उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर शाळेतील विद्यार्थी कल्पना पावरा, अंजली पावरा, अंकिता पावरा, निर्मला नाईक, अनिल पावरा यांनी हिंदी दिनावर भाषणे केली. शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक श्री. डी. बी. पाटील यांनी हिंदी दिनाचे महत्व समजावून सांगितले. अध्यक्षीय भाषणात श्री. एस. जी. सिसोदिया यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिनाचा व्यवहारात कसा उपयोग करावा या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वाय एस. महाले यांनी केला तर समारोप श्रीमती एस. एम. निकम यांनी केला.