शिरपूर - आशा व गटवर्तक संघटना धुळे जिल्ह्यातर्फे शिरपूर येथील वकवाड उपकेंद्रावर आरोग्य सेवक महेश ईशी यांनी आदिवासी समाजाच्या आशा च्या विनयभंग केला त्याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच विनयभंगाच्या गुन्हा दाखल झालेला आहे व त्यास अटक सुद्धा झालेली आहे असे असले तरी या आशा भगिनींनी कोरोना काळामध्ये आपल्या जिवाचा विचार न करता शासनाच्या अभियान राबवले त्याच्या त्या आशा भगिनींची जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा दखल घेतलेली आहे मात्र असे असताना आरोग्य विभागाचेच आरोग्य सेवक आशांच्या विनयभंग करत असेल अशी गोष्ट संघटना खवपून घेणार नाही म्हणून आयटक सलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी शिरपूर ,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर ,गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांना निवेदन देऊन संघटनेमार्फत या घटनेच्या निषेध करण्यात आला तसेच आरोग्य सेवक आरोपी यास निलंबित करण्यात यावे ,जलद न्यायालयात केस चालवून शिक्षा ठोठावण्यात यावी ,तसेच आशा व गटप्रवतकांना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी शारीरिक मानसिक त्रास देऊ नये असे आदेश वरिष्ठांनी द्यावेत अशा प्रकारचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अडॅ.हिरालाल परदेशी, जिल्हा सल्लागार अडॅ. मदन परदेशी , तालुका सल्लागार अडॅ संतोष पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुणा देवरे ,कार्याध्यक्ष स्मिता दोरीक, उपाध्यक्ष मालती इंदवे , वैशाली बारी ज्योती पाटील दीपा सारासार या आशा उपस्थित होत्या वरील प्रमाणे निवेदन देऊन वरील मागण्यांच्या पाठपुरावा करावा अन्यथा संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.
आशा कर्मचाऱ्यांच्या विनयभंग करणाऱ्या आरोपीस निलंबित करा - महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना
byMahendra Rajput
-
0