प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जय घोष करीत गुलालाची उधळण न करता ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाला थाळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने निरोप देण्यात आल. गणपती बाप्पाच्या स्थापनेपासून तर अनंतचतुर्दशी पर्यंत पोलीस प्रशासन बंदोबस्तात असल्यामुळे अनंतचतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात आला.या वेळी भंडाराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी थाळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आले.सकाळी अकरा वाजता थाळनेर येथील सावित्रीबाई फुले मुक-बधीर निवासी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकांना बोलवुन मीष्ठांन्याचे भोजन देण्यात आले.सर्व पोलीस कर्मचारी,सर्व विद्यार्थ्या व उपस्थितांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेऊन वाजंत्रीच्या तालावर ठेका धरला.अधिकारी, कर्मचारी व उपस्थितांनी फेटे परिधान केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी पोलीस गाडीत बसण्याची इच्छा व्यक्त केल्याने स्वता सपोनि उमेश बोरसे,पीएसआय कृष्णा पाटील विद्यार्थ्यांना गाडीत बसवुन शाळेत सोडल्याने विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद दिसत होता.पोलीस स्टेशन पासुन वाजत गाजत बाजार पेठेतुन जात तापी नदीत गणरायाचे विसर्जन करण्यात आले. प्रभारी अधिकारी सर्व पोलीस कर्मचारी, सर्व होमगार्ड, पोलीस पाटील छोटुलाल पाटील तोंदे, एकनाथ राठोड भाटपुरे, मोतीलाल परदेशी हीसाळे,दीपक पाटील ताजपुर, महीला पोलीस पाटील मनिषा ठाकरे, पोलीस मित्र राजकुमार जैन सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
news