शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वकांक्षी असा महत्त्वपूर्ण प्रकल्प शिरपूर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भातील मागणी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होती व गेल्या काही वर्षात शेतकरी संघर्ष समिती, किसान संघर्ष समिती, किसान सभा इत्यादी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देणारा संघटनांनी पाठपुरावा करून सदर विषयाला जनजागृती दिल्याने अखेर संचालक मंडळाला सदर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबतच्या निर्णय जाहीर करावा लागला. या निर्णयाचे स्वागत देखील करण्यात आले व त्यास बिनविरोध अनुमोदन देखील देण्यात आले.
मात्र सदर प्रक्रिया पार पाडत असताना सर्व शेतकरी सभासद व संघर्ष समिती यांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी निर्णय घेताना संचालक मंडळाने केलेल्या दडपशाही कारभाराच्या देखील निषेध व्यक्त केला आहे. याबाबत शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य कल्पेश जमादार यांनी जाहीर आक्षेप नोंदवला आहे.
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात साखर कारखाना सुरु होऊ न शकल्याने व विविध शेतकरी संघटना व सभासदांचा कारखाना सुरु करण्याच्या आंदोलनाचा वाढता दबाव लक्षात घेऊन अकार्यक्षम ठरलेल्या संचालक मंडळाला भाडे पट्ट्याने कारखाना सुरु करणेबाबत चा ठराव करणेसाठी सभासदांची विशेष सर्व साधारण सभा दि. १०.०९.२०२२ रोजी बोलवावी लागली. अकार्यक्षम संचालक मंडळाकडून कारखाना सुरु होऊ शकणार नाही हे विचारात घेऊन एक मताने शेतकरी सभासद संघटनांनी देखील मंजुरी (समर्थन) देण्याचे ठरविले व तसे वर्तमान पत्रात प्रसिद्ध देखील केले. सदर साखर कारखाना कसा व केव्हा सुरु केला जाईल हे कारखाना चेयरमन यांच्याकडून जाणून घेण्याची सभासद बांधवांची इच्छा होती. जाहीर नोटीस प्रमाणे सभेचा विषय हा विचार विनिमय करून निर्णय घेणे असाच होता व त्याप्रमाणे चर्चा होऊन निर्णय व्हावा अशी सभासदांची अपेक्षा होती. संचालक मंडळात याबाबत सभासदांना माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी योग्य किंवा तत्सम पदाधिकारी नसल्याने एका स्वयं घोषित रावसाहेब पदवी लावलेल्या प्रभाकर चव्हाण यांनी कोणत्याही अधिकृत पदावर नसताना व त्यांना काही एक अधिकार नसतांना शि.सा.का. चे एक जेष्ठ सभासद व मानव एकता पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुभाषसिंह जमादार यांना आपली सूचना देखील मांडू दिली नाही.प्रभाकर चव्हाण यांनी आपल्या भाषणात बोलल्या प्रमाणे की राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही परंतु राष्ट्रगीत चुकीचं बोलून राष्ट्रगीताचा सुद्धा अवमान केला. त्यावर संबंधित प्रभाकर चव्हाण यांना चेयरमन व व्हाईस चेयरमन यांनी देखील आवर घातला नाही व व्यासपीठावर उपस्थित लोकप्रतिनिधींनी देखील बघ्याची भूमिका घेत या प्रवृत्तीला समर्थन दिले. अशा या लोकशाही मार्गाने सभासदांचे अधिकार व विचार मांडण्याचे स्वातंत्र्य नाकारणाऱ्या प्रवृतींचा, मानव एकता पार्टी पदाधिकारी, शेतकरी संघर्ष समिती व सभासदांच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करतो अशी भावना कल्पेश जमादार यांनी मांडले आहे.