अजनाड बंगला ता.शिरपूर येथील गावा जवळ वळणावर दुपारी ३ वाजेच्या सुमारास चोपडा कडुन शिरपूरकडे फरशी भरुन जाणा-या दहा चक्का जीजे ३३टी ९९१५ या गाडीत शिरपूर कडुन चोपडाकडे जाणा-या दुचाकी एमएच १८ बीपी ९४२२समोरुन आल्याने अपघात झाल्याने दुचाकी वरील धरमा सुरपाल पावरा राहणार पिळोदे ह.मु.पातोंडा,ता.अंमळनेर हा जागीच ठार झाला. अपघातत धरमा पावरा याचे माने पासुन वेगळे होऊन अक्षरशा छिन्नविछिन्न झाले होते.या वेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अजनाड बंगलाचे सामाजिक कार्यकर्ते दरबार जाधव,अनार जाधव रहदारी सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत करत थाळनेर पोलीस स्टेशनला कळवीले.तात्काळ सपोनि उमेश बोरसे कर्मचारींसह हजर होऊन रहदारी सुरळीत केली.तर पोलीस मित्र राजकुमार जैन यांनी १०८ क्रमांकाला फोन करून रुग्णवाहिकेतु शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले व मयाताच्या भ्रमणध्वनीवर येणा-या फोनद्वारे नातेवाईकांना कळवीले.ट्रक चालकला ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपाम सपोनि उमेश बोरसे करीत आहेत.