सुपारी देऊन केला महिलेचा खुन आरोपी अटकेत प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे :सुमारे पंधरा दिवसांपूर्वी पिंपरी येथे एका महिलेचा अडवून खून करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट पाच यांनी अनैतिक संबंधातून ही हत्या झालेली आहे असे सांगितलेले असून मयत महिला ही सतत लग्नाचा तगादा लावत होती म्हणून आरोपीने तिची सुपारी देऊन हत्या केली असे समोर आले आहे.


उपलब्ध माहितीनुसार, बजरंग मुरली तापडे ( वय पंचेचाळीस राहणार तळेगाव दाभाडे ), पांडुरंग बन्सी हरके ( वय 35 राहणार मोशी ) सचिन प्रभाकर पिंगळे ( वय 30 राहणार बुलढाणा ) , सदानंद रामदास तुपकर ( वय 26 राहणार बुलढाणा ) अशी आरोपींची नावे असल्याचे समजते.


आरोपी बजरंग तायडे याच्यासोबत या महिलेचे प्रेमसंबंध होते. मयत महिला ही आरोपीकडे सतत लग्नाचा तगादा करत होती. बजरंग हा आधीपासून विवाहित असल्याने त्याला तीन मुले देखील आहे त्यामुळे त्याचा या विवाहाला स्पष्ट नकार होता मात्र महिला सतत लग्नाचा तगादा लावत असल्याने त्यांनी या महिलेच्या हत्येची सात लाख रुपयांची सुपारी आरोपी पांडुरंग हरके याला दिली होती.


बजरंग याने पांडुरंग यास चार लाख रुपये दिले त्यानंतर पांडुरंग याने त्याचा मित्र सचिन आणि सदानंद यांना देखील आपल्या कटात सहभागी करून घेतले. नऊ ऑगस्ट रोजी ही महिला स्कुटीवरून जात असताना आरोपी सचिन आणि सदानंद यांनी तिला अडवले आणि केस पकडून धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार केले आणि तिथून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर परिसरातील तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींना जेरबंद केले असून तपास सुरू असल्याचे समजते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने