पुणे - मुंबई ठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार यांचे
थोरले बंधू प्रा.गुलजारसिंह राजपूत(नंदुरबार) यांची कन्या सौ.संगीता रामराजे पाटील(ह.मु.पुणे) हिची सुकन्या *सौ.निशा विघ्नेश* जिचा नुकताच *सिंगापूर* येथे विवाह(१ सप्टेंबर)संपन्न झाला तर,पुणे येथे (६ सप्टेंबर)रिसेप्शन झाले.आणि बघता-बघता जणू आनंदाला उधाणच आले.ती जर्मनी विद्यापीठातून इंजिनिअरिंग विभागातून एम.एस.उत्तीर्ण झाली.खऱ्या अर्थाने हा दुग्ध-शर्कराचा योगच म्हणावा.
भाग्याची गोष्ट म्हणजे ती एम.एस.(सेकंड इयर) मध्ये जर्मनी विद्यापीठातून (Technical University Of Munich,Germany) *डिस्टींक्शन* पोझिशनने उत्तीर्ण झाली असून,तिला ७० टक्केहून अधिक गुण प्राप्त झाले आहेत. या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे जगातील हे एक इंजिनिअरिंगचे नामवंत विद्यापीठ असून,येथे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश मिळणे अतिशय अवघड असते.जगातील हुशार-बुद्धिमान विद्यार्थी येथे एडमिशनसाठी शर्थीचे प्रयत्न करत असतात. वास्तविक पहाता,सौ.निशा ही एम.एस.मध्ये डिस्टींक्शन मिळवून उत्तीर्ण होणारी राजपूत समाजाची पहिली खानदेश सुकन्या आहे.
आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या राजपूत समाजातील कन्येने एक नवा इतिहास संपादन करून विशेष असे यश संपादन केले आहे आणि ही सर्व खान्देश वासियांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
त्यांच्या या यशाबद्दल परिवारातून समाज बांधवातून व संपूर्ण खानदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांना पुढील भविष्यातील त्यांच्या योजना व योगदान यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
निर्भीड विचार न्यूज परिवार यांच्याकडून त्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस अनंत शुभकामना.