आध्यात्मिक कार्यासोबत रक्तदान शिबी, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण,नेत्र तपासणी आदी सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशनच्या शिरपूर शाखेतर्फे युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील शहरातील शकुंतला मँरेज लाँंस येथे भाऊसाहेब हिरे मेडिकल काँलेजच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन आ कांशीराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.भव्य रक्तदान शिबिरासाठी एक दिवस आगोदर संपूर्ण शिरपूर शहारात जनजागृती रँली करण्यात आली होती. यावेळी 160 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सहभाग नोंदवला. यावेळी रक्तदात्यांसाठी अल्पोपहार,जेवनाची निरंकारी मिशनतर्फे व्यवस्था करण्यात आली होती तसेच यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रशस्ती पत्र देण्यात आले.
कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक धुवकुमार वाघ,होळनांथे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत नानासाहेब चव्हाण,खर्देचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील,माजी उपनगराध्यक्ष काशीनाथ माळी,संतोष माळी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरपूर च्या संत निरंकारी मिशनचे क्षेत्रीय प्रभारी हिरालाल पाटील,सेवादल अधिकारी जगदीश माळी व शिरपूर शाखेचे मुखी गणेश पाटील सह सेवादल सदस्य पुरुष व महिलांनी अथक परिश्रम घेतले
Tags
news