शिरपूर - दिनांक 05l 07l 2022 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवडणूक पार पडली याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ललित पाटील कृषी सहाय्यक शिरपूर सोसायटीचे सचिव कैलास गुजर उपस्थित होते याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी ललित पाटील यांच्या अध्यक्ष खाली सर्व सभासदांची मीटिंग बोलवण्यात आली सर्व सभासदांचे वतीने चेअरमन आणि व्हाईस चेअरमन ची निवडणूक करण्यात आली ह्या वेळेला बहुजन मुक्ती पार्टी चे दिलीप भाईदास पाटील राहणार विखरण यांची चेअरमन पदी निवडणूक करण्यात आली तसेच धोंडू झिंगा पाटील उर्फ धोंडू गुरुजी राहणार विखरण यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली ही निवड सर्वानुमते करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी ललित पाटील यांनी वरील दोघे नाव चे फार्म वाचून दाखवले सर्वानुमते दोघंही नावांना अनुमती देण्यात आली याप्रसंगी संस्थेचे सचिव कैलास गुजर यांनी आभार मानले याप्रसंगी सोसायटीचे माजी चेअरमन प्रताप खंडू पाटील व्हाईस चेअरमन योगेश दगाजी पाटील माननीय विनायक नाना शाम पाटील विखरण गावचे सरपंच शिवमती मीनाताई मनोज पाटील उपसरपंच शिवमती रूपालीताई प्रमोद धनगर आणि सर्व ग्रामपंचायत सभासद विखरण विखरण गावचे दोघे पोलीस पाटील ग्रामस्थ सर्व तरुण मित्र मंडळ सगळ्यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन यांचं अभिनंदन केले चेअरमन व्हाईस चेअरमन पदावर विराजमान झालेले आणि सर्व संचालक मंडळ विखरण गावातील पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन पांडुरंगा चरणी लोटांगण घालून आशीर्वाद घेतले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला तसेच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला विखरण गावचे रहिवासी टेंभे गावाचे ग्रामसेवक विखरण गावाचे रहिवासी धोंडू झिंगा पाटील यांचे जावई धनराज भाऊसाहेब यांच्या घरी पोहा चहापाण्याची आयोजन करण्यात आलं होतं
विखरण तालुका शिरपूर वि. वि. का. विखरण खु ll चेअरमन पदी बहुजन मुक्ती पार्टी दिलीप भाईदास पाटील
byMahendra Rajput
-
0
