शिंदखेडा तालुक्यातील भडणे हे गाव राजकीय दृष्ट्या जसे अग्रेसर आहे तसेच वारकरी व सांप्रदाय क्षेत्रात नेहमी आघाडीवर असते दरवर्षी भडणे या गावातून 500 च्या वरती भावीक पंढरपूर साठी रवाना होत असतात अशीच परंपरा येथील माजी सरपंच पांडुरंग पुना माळी यांनी दरवषीगावातील भावी भक्त प्रवास सुरळीत व्हावा, या उद्देशाने, पंढरपूर जाणारे बस चे पूर्ण क्षमतेचे प्रवासीभावीक, यांना,जमा करून दरवर्षी शिदखेडा आगारातून आगार प्रमुख गावित साहेब यांना भेटून स्वतंत्र बस भडणे, पंढरपूर,येथे आज दिनांक 6 जुलै रोजी सकाळी दहा वाजता,उपलब्ध करून दीली होती सकाळी शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते पंढरपूर बस चे पूजन करण्यात आले गावातील प्रगतशील शेतकरी वसंत पाटील यांनी बसला पुष्पहार तसेच नारळ फोडण्यात आले तर यावेळी माझे सरपंच पांडुरंग माळी यांनी बसला भगवा ध्वज दाखवून रवाना झाले यावेळी माझी सरपंच भबुतराव पाटील बडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी समता परिषद चे युवा जिल्हाध्यक्ष योगेश पांडुरंग माळी विठोबा पाटील खुशाल पाटील तलाठी मनोज गोसावी पोपट माळी योगेश पाटील भागवत गिरासे यशवंतराव पाटील हिरालाल पाटील आदी मान्यवर पांडुरंगाच्या घोषणांनी बसला रवाना केली,
Tags
news
