बोराडी वनक्षेत्र कार्यालयात कृषी दिनानिमित्त आदिवासी शेतकरी बांधवांना वन सातबारा वाटप


 

शिरपूर : तालुक्यातील बोराडी वनक्षेत्र कार्यालयात कृषी दिनानिमित्त आदिवासी शेतकरी बांधवांना  

अनुसूची-जे (वन सातबारा) वाटप शिरपूर तालुक्याचे नेते, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते शनिवारी  

दि. 2 जुलै रोजी करण्यात आले. 

 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्क मान्य करणे) नियम 

2008 नुसार जोडपत्र – दोन प्राप्त झाल्यानंतर वन विभगातर्फे आदिवासी शेतकरी बांधवांना अनुसूची-जे  

(वन सातबारा) वाटप करण्यात आले. 

 

यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर पंचायत समितीचे सभापती सत्तारसिंग पावरा, 

बोराडी वन क्षेत्रपाल ए. एम. मेश्राम, बोराडी उपसरपंच राहुल रंधे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील उपस्थित 

होते. तसेच कार्यक्रमाला सेवानिवृत्त फॉरेस्ट अधिकारी गवळी, जयवंत पाडवी, सुक्राम पावरा, योगेश बादल,  

रमण पावरा, वसंत पावरा, प्रभाताई कोकणी, अनिता पावरा, कैलास पावरा, किसान सभेचे ॲड. हिरालाल  

परदेशीमनजीत पावरा, कैलास पावरा, नारसिंग पावरा, राजेंद्र पाटील, जगन टेलर पावरा, बागल्या पावरा, अनेक जिल्हा  

परिषद सदस्यपंचायत समिती सदस्य, आदिवासी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. 

 

यावेळी पं. स. सभापती सत्तारसिंग पावरा मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, वर्षानुवर्षे आदिवासी बांधव  

वन सातबारा साठी लढत होता. माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भूपेशभाई पटेल 

व अनेकांनी मनापासून प्रयत्न व पाठपुरावा केल्याने असंख्य आदिवासी बांधवांना हक्काचा वन सातबारा मिळत असल्याने समाधान वाटत आहे. परंतु, शिरपूर तालुक्यात 11,407 आदिवासी शेतकरी बांधवांचा सातबारा  

प्रलंबित असून सर्व सातबारा मिळावे, यासाठी भाई व दादा प्रयत्नशील आहेत. अनेकदा भाई व दादा यांच्या  

मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातशासनाकडेवनविभागा कडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. आमदार  

काशिराम पावरा यांनी अनेकदा व गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात इशारा दिला होता की, येत्या 15  

दिवसात म्हणजे 30 जून 2022 पर्यंत वन सातबारा मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता. भाई व 

दादा, अनेक पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. अतिक्रमण धारकांना आता वन सातबारा मिळाले. 

कोणालाही पैसे व दलाली देवू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

 

प्रास्ताविकात बोराडी वन क्षेत्रपाल ए. एम. मेश्राम म्हणाले, अनुसूची-जे हा वन सातबारा मिळाल्यानंतर  

आता पीक पेरा नोंदी होऊन सर्वांना शासनाच्या सुविधा मिळतील. शिरपूर तालुक्यात 11 हजार पेक्षा जास्त  

प्रस्ताव पेंडिंग होते. भाई व दादा तसेच आमदार कार्यालयाकडून टीम व यंत्रणेची मोठी मदत झाली. कृषी दिनाचे  

औचित्य साधून प्रमाणपत्रे वाटप होत आहेत. कोणी पैशांची मागणी करत असेल तर फॉरेस्ट कार्यालयाशी संपर्क  

साधावा.  

 

यावेळी सेवानिवृत्त वनाधिकारी गवळी म्हणाले, आता आदिवासी शेतकऱ्यांना विविध सुविधांचा लाभ मिळेल. 

ॲड. हिरालाल परदेशी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.  

 

जयवंत पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वनपाल एस. पी. मंडलिक यांनी केले. 

 



 



 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने